How To Make Wedding Invitation Video | Wedding Invitation Video in mobile | Marathi wedding invitation card |

How To Make Wedding Invitation Video | Wedding Invitation Video in mobile | Marathi wedding invitation card |




नमस्कार मित्रांनो,

पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत आहे, तर ज्या पद्धतीने तुम्ही टायटल आज वाचला असेल तर काही सदस्याच पद्धतीने आज मी तुम्हाला आपण लग्नपत्रिकेचा मायना आणि जे काही आपली निमंत्रण पत्रिका असते तर तिच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि ते कशा पद्धतीने टाकल्या पाहिजेत या सर्वांची माहिती तुम्हाला आज मी या ठिकाणी देणार आहे.


                                                                                  




मुहूर्त : 

आपला हिंदू धर्मात कोणतेही शुभ शुभ कार्य करायचे म्हणले का सगळ्यात पहिले पाहिलं जातो तो म्हणजे मुहूर्त आणि आपले ते त्या शुभ मुहूर्तानुसारच आपले जे काही काम असेल तर ते काम आपण या ठिकाणी करत असतो. आपला हिंदू पंचांगानुसार वर्षभरात असे काय आपले महत्त्वाचे दिवस असते ते झाला की आपण शुभ मुहूर्त म्हणून म्हणतो तर त्यामध्ये पहिला येत आपलं "अक्षय तृतीया" त्याच्यानंतर आहे "गुढीपाडवा"  त्याच्यानंतर "दीपावली पाडवा" "दसरा"  त्याच्यानंतर "देवशयनी एकादशी" तर अशा पद्धतीचे जे काही मुहूर्त असतील तर आपल्याकडे सगळ्यात जास्त पाळले जातात.आपण जसे बाकीच्या वळसला मूर्त पाळतो सण उत्सव साजरे करताना तर त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण लग्न समारंभ अस आपल्याकडे तर त्यावेळेस ला सुद्धा जो काही विवाहाचा मुहूर्त असेल तर तो आपण सर्वात आधी ज्योतिष शास्त्रानुसार काढून घेत असतो, आणि मग त्या काढलेल्या मोरदानुसारच आपल्याकडे जे काही लग्न असतील तर ते लग्न वेळेवर या ठिकाणी लावले जातात.


                                                                   



  • लग्नपत्रिका कशी असावी ?

त्याचा मायना कसा असावा त्याबद्दलची जी काही माहिती असेल तर ती आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि सध्याचे जे काही नवीन युग असेल Technology तर त्या युगामध्ये सुद्धा बरेच जण आपले जे काही पत्रिका असेल तर ते प्रिंट माध्यमातून सुद्धा देतात आणि जास्तीत जास्त सध्या कोरोनाचा वगैरे पिरेड संपल्यानंतर सुद्धा बरेच जण जो काही Digital डिजिटल मार्ग असेल म्हणजे जे काही आपल्याकडे डिजिटल Application असतील तर त्यामध्ये मुख्यत्वे, 

  • FACEBOOK 
  • TWITTER 
  • WHATSAPP 
  • INSTAGRAM

 यासारखे जे काही सोशल मीडियाचे आपलिकेशन असतील तर यांच्या माध्यमातून सुद्धा जे काही पत्रिका असतील तर ते इकडल्या तिकडं वाट लावल्या जातात आणि जे काही निमंत्रण असेल तर ते या ठिकाणी दिला जातो.


                                                                            


                                                                     



आपल्याकडे लग्नपत्रिका जो काही मजकूर असाल तर तो खालील प्रमाणे असावा.


  1. तुमच्या कुलदैवताचे नाव :


स.न.वि.वि. श्री. कृपेकरून आमच्या घरी,



1.नवरीचे किंवा नवर्‍या मुलीचे पूर्ण नाव :

( त्यांच्या आजोबाचे त्यांच्या वडिलांचे त्यांचं गाव आणि त्यांचा जो काही जिल्हा असेल किंवा तालुका तर हे सर्व या ठिकाणी टाकावे ) यांची जेष्ठ कन्या ( छोटी असेल तर कनिष्ठ टाकावे मोठी असेल तर ज्येष्ठ टाकावे ) 


2.नवरदेवाचे किंवा नवर्‍या मुलाचे पूर्ण नाव :

( जर तुम्हाला सुरुवात त्यांच्या आजोबापासून करायचे असेल तर त्यांचं नाव त्यांच्या नंतर त्यांच्या वडिलांचे नाव त्यांचं राहतं गाव त्यानंतर त्यांचा जिल्हा किंवा त्यांचा जो काही तालुका असेल तर हे सर्व माहिती या ठिकाणी टाकावी ) 

यांचे ज्येष्ठ सुपुत्र ( मुलगा छोटा असेल तर कनिष्ठ टाकावे मुलगा मोठा असेल तर ज्येष्ठ टाकावे ) 

                                                                                 

दोन्ही नावं झाल्याच्या नंतर यांचा शुभविवाह करण्याचे योजिले आहे अशी लाईन टाकावी ( त्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने बदल करू शकता )



3.हळदी समारंभ :

  • कार्यक्रमाची दिनांक
  • कार्यक्रमाचा वार
  • कार्यक्रमाची वेळ


4.विवाह मुहूर्त : 

  • कार्यक्रमाची दिनांक
  • कार्यक्रमाचा वार 
  • कार्यक्रमाची वेळ


5.विवाह स्थळ :

विवाह स्थळ तुम्ही दोन-तीन पद्धती मध्ये टाकू शकता,

  • जर तुमचा मंगल कार्यालयामध्ये लग्न असेल तर मंगल कार्यालयाचे नाव त्याखाली त्या गावाचं नाव त्यानंतर त्याचा तालुका आणि जिल्हा तुम्ही टाकू शकता.
  • जर लग्न कोण्या मंदिरामध्ये असेल तर त्या मंदिराचे नाव ( केदारनाथ महादेव मंदिर, श्री तिरुपती बालाजी मंदिर, हनुमान मंदिर, राम मंदिर अयोध्या , श्रीकृष्ण मंदिर वृंदावन ) अशा पद्धतीने मंदिराचे नाव त्या खालोखाल मंदिर कुठे आहे त्या गावाचे नाव त्यानंतर त्याचा तालुका आणि जो काही जिल्हा असेल तर जिल्हा त्या ठिकाणी टाकून घ्यावा.
  • जर लग्न तुमच्या घरी असेल तर घराचं जे काही नाव असेल तर ते घराचं नाव तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर तुमचा जो काही राहतं गाव असेल तर त्या गावाचं नाव त्यानंतर तुमचा तालुका आणि त्यानंतर जो काही जिल्हा असेल तो जिल्हा टाकून घ्यावा.



                                                                           





एवढा मजकूर झाल्याचा नंतर ज्या साईडनं तुम्हाला पत्रिका बनवायचे असेल म्हणजे जर तुमची पत्रिका नवरी कडून असेल तर नवरीचा जे काही आडनाव असेल तर ते आडनाव टाकून त्या ठिकाणी समस्त परिवार असं टाकून तुम्ही सांगू शकता.


5.निमंत्रक :

ज्या साईडची पत्रिका असेल, उदाहरणार्थ पत्रिका जर नवऱ्या मुलाकडून असेल तर त्याचं जे काही आडनाव असेल ते त्याला सोडून त्याच्या गावाचं नाव किंवा त्याचा पूर्ण परिवाराचं नाव टाकून तुम्ही निमंत्रक म्हणून ही पत्रिका तयार करू शकता. किंवा जर तुम्हाला प्रिंटिंग साठी ची डिझाईन तयार करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही वडीलधारी माणसं असतील तर त्यांच्यापासून सुरुवात करून जे घरामधले छोट्यातले छोटे माणसं असतील म्हणजे लग्न झालेले तर त्यांचं नाव त्यानंतर त्यांच्या बायकोचं नाव आणि त्यांच्या वडिलांचे नाव तर तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता.



6.छोटे निमंत्रक :

जर तुमच्या घरी छोटे बाळ वगैरे असतील तर त्यांचे नाव तुम्ही चिरंजीव, कुमारिका, श्री, अशा पद्धतीने लावून जे काही छोट्या मुलांचे नाव असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि तुमची जी काही डिझाईन असेल तर ती तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता



                                                                                



तर मित्रांनो काही फॉरमॅटमध्ये मी तुम्हाला आजची जी काही लग्नपत्रिकेचा मायना असेल तर तो मी या ठिकाणी सांगितलेला आहे तर आता प्रत्येक जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार हा जो काही मॅटर असेल तर हा चेंज होत असतो आता काहीजण नवीन पार्टनुसार त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये जे काही नाव असतील तर ते टाकत चाललेले आहेत तर तुम्हाला त्याच्या पद्धतीची बनवायचे असेल तर मी तशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी क्रिएट करू शकता तर एक उदाहरण असतं मी जे काही पत्रिकेचा फॉरमॅट असेल तर तुम्हाला या ठिकाणी आज मी सांगितलेला आहे अशा करतो तो तुम्हाला पूर्ण आवडलेला असेल.




अशाच पद्धतीच्या नवनवीन मराठी ब्लॉगसाठी हे जे काही पोस्ट असेल तरी पोस्ट सेव करून ठेवायला आणि सोबतच तुमचे जे काही मित्र किंवा मैत्रीण असतील त्यांच्यासोबत शेअर करायला तुम्हाला विसरायचं नाहीये आणि समजा हा ब्लॉग वाचते वेळेस तुम्हाला काही अडचणी वाटला तर माझी जी काही इंस्टाग्राम ची आयटी असेल तर ती मी वर तुम्हाला दिलेली होती तर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही माझ्यासोबत डायरेक्टली जे काही डिस्कशन असेल ते सुद्धा या ठिकाणी करू शकता.



#weddingcard, #marathiweddingcard,#marathicard, #marathilaganpatrika, #lagnpatrika,wedding invitation card design,wedding invitation card,wedding invitation video editing,wedding invitation video editing in kinemaster,kinemaster wedding video,wedding video,marathi lagan patrika,lagan patrika design,lagna patrika design in mobile,printing wedding card,

3 Comments

  1. Mla kinemaster app bhetat nahi ahe mla link send krta ka

    ReplyDelete
  2. https://www.youtube.com/playlist?list=PLpuCwk5eX8mMJQxt0G9FL8oGzq0EElCCF

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post