Maharashtra Din Banner Editing | Maharashtra Din Banner Editing in PicsArt | #maharashtradinbannerediting
नमस्कार मित्रांनो मी आकाश बेद्रे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतोय
तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला PICSART APPLICATION चा उपयोग करून तुम्ही उत्कृष्ट आणि सुंदर बॅनर कसा तयार करायचा त्याच्या बद्दलची माहिती देणार आहे, माहिती सोबतच मी तुम्हाला एक बॅनर तयार करून दाखवणार आहे, डिझाईन किंवा बॅनर असे तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला जो शब्द आवडेल तो तुम्ही या ठिकाणी म्हणून उपयोग करा.
तर या ठिकाणी मी तुम्हाला PICSART APPLICATION च्या मदतीने "महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय
कामगार दिन " निमित्त शुभेच्छा देणारे बॅनर कसे तयार करावे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला
आजच्या ब्लॉग मध्ये देणार आहे.
तर चला मित्रांनो आता आपल्याला " महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन " ची डिझाईन तयार करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे. ते साहित्य कोणकोणते आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला खाली दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते सर्व पीएनजी मटेरियल आणि बॅकग्राउंड डाऊनलोड करून किंवा जमा करून घ्यायचे आहेत ..
सामग्री / साहित्य :
- पिक्सआर्ट एप्लीकेशन
- एक स्मोक बॅकग्राऊंड
- छत्रपती शिवाजी महाराज फोटो
- महापुरुषांचे फोटो पीएनजी
- काही टेक्स्ट पीएनजी
- महाराष्ट्र दिन नावाची कॅलिग्राफी
- दोन नावाच्या पट्ट्या
- एक मॉडेल व त्याचं नाव
- काही लाईट पीएनजी
- नावाचा लोगो
मित्रांनो वरी जे मी तुम्हाला साहित्य सांगितलं तर ते सर्व सामान तुमच्याकडे असायला पाहिजे. जर ते सर्व तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्हाला खाली एक डाऊनलोड पीएनजी नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला ते सर्व पीएनजी आणि बॅकग्राउंड दिलेले आहेत त्या ठिकाणावर क्लिक करून तुम्ही ते डाऊनलोड करून घेऊ शकता आणि त्याचा उपयोग तुमची डिझाईन तयार करण्यासाठी करू शकता.
तर मित्रांनो आता मी जसं सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे सर्व मटेरियल आला असेल तर आता तुम्हाला मी जे काही खाली स्टेप सांगणार आहे तर त्या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत तर त्या सर्व स्टेप्स फॉलो केलं त्यानंतर तुम्ही सुद्धा PICSART APPLICATION मध्ये चांगली आणि सुंदर फोटो बॅनर तयार करू शकता , तर चला मित्रांनो कुठलाही प्रकारचा वेळ वाया न घालवता लागलीच आपल्या डिझाइनला सुरुवात करुया :
👉 सर्वात आधी तुम्हाला तुमच PICSART APPLICATION ओपन करायचे आहे, एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ( + ) अस आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर ऑल फोटोज नावाचा एक ऑप्शन दिसत असेल त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायच आहे.
👉 एवढे झाल्यानंतर तुम्हाला एक ऍड फोटोज नावाचा ऑप्शन मिळेल त्या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलाय चॉकलेटी कलर च तर ते बॅकग्राऊंड तुम्हाला तुमच्या फोटो वर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे तर मित्राने बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड झाल्यानंतर खालील ऑप्शन मिळून जातील.
👉 बॅकग्राऊंड ऍड झाल्यानंतर मित्रांनो ,
त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो मी तुम्हाला दिलेला आहे तो किंवा जो कोणता तुम्हाला आवडत असेल तो फोटो तुम्हाला त्या बॅकग्राऊंड च्या वरती ऍड करून घ्यायचा आहे.
👉 त्याचा नंतर त्याच ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा नकाशा मिळून जाईल तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे ,महाराष्ट्र राज्याचा नकाशा त्या ठिकाणी ऍड केल्या नंतर त्या नकाशावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचा नंतर खाली तुम्हाला उपस्थितीत नावाचं एक ऑप्शन दिसेल तर त्या उपस्थिती नावाचा ऑप्शनवर क्लिक करायचे आणि त्याची उपस्थिती असेल ती ऑपॅसिटी तुम्हाला नऊ किंवा दहा पर्यंत या ठिकाणी सेट करायची आणि त्याच्यानंतर नावाचं एक ऑप्शन मिळून जाईल तर त्या प्लेट नावाच्या तुम्हाला क्लिक करायचं आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला उरले नावाचं एक मिळून जाईल तर तो तुम्हाला त्या नकाशा ला लावून घ्यायचा आहे . उदाहरणासाठी तुम्ही मी जी फोटो तुम्हाला वरती दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करू शकता.
👉 तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र राज्याचा नकाशा लावून झाल्याच्या नंतर तुम्हाला एकदम खालच्या साईडला एक पांढर्या रंगाची पट्टी लावून घ्यायची आहे आणि या पट्टीच्या वरती तुम्हाला तुमचा जो काय मॉडेल असेल किंवा ज्याचा कोणाचा फोटो तुम्ही मॉडेल म्हणून वापर करत असाल तर त्याची फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लावून घ्यायची आहे तर त्याची फोटो त्या ठिकाणी लावल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी या मॉडेलचं जे काही नाव ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकून या लावून घ्यायचं आहे तर हे झाल्याच्या नंतर आपला वरचा आणि खालचा भाग पूर्णपणे तयार होऊन जाईल.
👉 एवढा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला ज्या एक्स्ट्रा च्या टेक्स्ट पीएनजी आणि सोबतच लाईट पीएनजी दिलेली असेल त्या पीएनजी तुमच्या बॅनर मध्ये तुम्हाला ऍड करून घ्यावयाचा आहेत.
त्याच्यानंतर मित्रांनो उजव्या साईडला वरच्या वरती तुम्हाला जो काही महापुरुषांचा फोटोचा मी एक चौकोन बॉक्स दिला असेल तर तो चौकोनी बॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी लावून द्यायचा आहे तर तो बॉक्स एकदम काळजीपूर्वक त्या ठिकाणी लावून घ्या ..
मित्रांनो मी जे महापुरुषांचे फोटोची प्रेम तुम्हाला दिली होती ती प्रेम लावून झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र दिन नावाची कॅलिग्राफी दिसत असेल तर ती कॅलिग्राफी तुम्हाला त्या ठिकाणी लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक निळ्या रंगाची पार्टी देण्यात आलेली असेल तर ती पट्टी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायची आहे तर ती पट्टी तुम्हाला आपण जी कॅलिग्राफी वापरली असेल त्याच्या खाली ठेवायची आहे आणि तिची जी काही ऑपॅसिटी असेल ती तुम्हाला नऊ-दहा ठेवायची आहे त्याच्यानंतर त्याठिकाणी राइट्स ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
👉 तर आता तुमच्या डिझाईन मध्ये तुम्हाला जर अजून थोडीशी ॲट्रॅक्टिव्ह आणि छान बनवायची असेल तर त्यासाठी तुम्ही तुम्हाला जे काही लाईट पीएनजी आणि एक्सप्रेसचा टेक्स्ट पीएनजी यांच्यामध्ये महाराष्ट्र दिनाचे महत्त्व स्पष्ट केलेले असेल किंवा जे काही घोषवाक्य असतील त्या सर्व पेनिस तुम्हाला तुमच्या बॅनर मध्ये लावून घ्यायच्या आहेत, अशा पद्धतीचा सर्व पीएनजी तुम्हाला तुमच्या डिझाईन मध्ये ऍड करून घ्यायचा आहे त्यामुळे तुमची डिझाईन अजून सुंदर आणि चांगली दिसेल.
👉 आता डिझाईन बनवण्याचा सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे तुम्हाला तुमचा जो काही तुमच्या स्वतःच्या नावाचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला त्या ठिकाणी डाव्या साईडला वरच्या भागा मध्ये जी सुट्टी जागा दिसत असेल तर त्या जागी मध्ये तुम्ही तुमचा जो काही लोगो असेल तर तो त्या ठिकाणी टाकू शकतात.
मित्रांनो प्रत्येक डिझाइनमध्ये लोगो हा टाकावा लागतो कारण त्याच्यामुळे ही डिजाइन कोणी तयार केली आहे आणि कशी बनवली आहे त्याच्या संबंधित जर कोणाला माहिती पाहिजे असेल तर त्या ठिकाणाहून त्यांनी आपल्याला कॉल किंवा मेसेज करून विचारू शकतात त्यामुळे एक प्रकारची आयडेंटिटी बनते तर अशा गोष्टीमुळे लोगो हा वापरलाच पाहिजे तर तुम्ही सुद्धा तुम्हाला जसा पाहिजे असेल तशा पद्धतीचा लोगो तयार करू शकता आणि त्या ठिकाणी टाकू शकता.
तर मित्रांनो या ठिकाणी आपली जी डिझाइन असेल ती पूर्णपणे तयार झालेली आहे तर आता तयार केलेली डिझाईन तुमचा मोबाईल मध्ये किंवा गॅलरी मध्ये कशी सेव करावी याची पूर्ण माहिती तुम्हाला खालील स्टेप्स मध्ये सांगितले आहेत तर त्या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत.
तर आता तयार केलेली डिझाईन किंवा बॅनर कसं सेव करायचं त्यासाठी खाली ज्या स्टेप्स सांगितल्या
आहेत ते सर्व बरोबर फॉलो करा म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
MAIN STEPS TO SAVE HD BANNER IN MOBILE PHONE :
👉 सर्वात आधी तुम्हाला एक ड्रॉ नावाचं ऑप्शन दिसत असेल तर त्या ड्रॉ नावाच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तीन टिंब दिसत असतील तर त्या तीन टिंब वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
👉 तीन टिंबा वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक सेव इमेज नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंही तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक कराल तुम्हाला सेव इमेज असं नाव दिसेल.
First video material download
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला ,
" महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार " दिनानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर कस तयार करायचा याच्या बद्दल ची पूर्ण माहिती सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला जरी पूर्ण माहिती समजली असेल तर अशा पद्धतीच्या तुम्ही असंख्य डिजाइन तुमच्या मोबाईल मध्ये तयार करू शकतात तर त्या अजून उत्तम होण्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टीस करावी लागेल तर तुम्ही योग्य ती प्रॅक्टिस योग्य ते साहित्य जमा करून ठेवला तर तुम्ही अशा पद्धतीच्या कित्येक डिझाईन तुमच्या मोबाईल मध्ये तयार करू शकता.
धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्याच अशा एक नवीन आणि इंटरेस्टिंग पोस्टमध्ये तोपर्यंत काळजी घ्या …
kavaresunil0@gmail.com (Google)
ReplyDeletemadhavbudhavet4490@gmail.com
ReplyDeleteEkdum kdkkk posts bhau...
ReplyDeleteकडक भाऊ
ReplyDeletePost a Comment